मराठी भाषेत रूढ झालेले अरबी, फार्सी व हिंदी भाषेतील शब्द
पोहरादेवी वेब पोर्टल न्यूज लेखक : प्रोफेसर डॉ. अनंत सूर्यकार
मराठी भाषा ही विविध भाषांच्या समृद्ध शब्दसंपदेने विकसित झालेली भाषा आहे. अरबी, फार्सी आणि हिंदी भाषांमधील अनेक शब्द मराठीमध्ये रूढ झाले असून, आज ते आपल्या दैनंदिन व्यवहारातील भाषेचा अविभाज्य भाग बनले आहेत.
भाषेचे ज्ञान समृद्ध करण्यासाठी अशा शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यातील काही निवडक शब्द पुढीलप्रमाणे —
आइंदा — पुढच्या साली, यंदा,आख्खा — सबंध,आगे — पुढे,आगेमागे — जवळपास,आतष — अग्नी,आतशखाना — तोफखाना
आतशबाजी — दारुकाम, चैन,आदत — सवय,आदरून — मुद्दाम,आदिकरून — इत्यादी, वगैरे,आप — स्वतः,आफत — संकट
आब — पत, प्रतिष्ठा,आबकारी — मादक पदार्थावरील जकात,आबाद — समृद्ध,आबादानी — शांतता, सुख-समृद्धी,
आबादीआबाद — भरभराट, सुख-स्वास्थ्य,आम — सार्वजनिक,आमनेसामने — प्रत्यक्ष, समोरासमोर,आयते — फुकट
आवर्जून — अगत्याने,आशक — मोहित, अनुरक्त, फिदा,आवारा — रिकामटेकडा,आसान — सोपे,आस्ते — सावकाश
इकरार — करार, ठराव,इजा — दुखापत,इजाफा — वाढ, बढती,इजारा — खंड, मक्तेदारी, भाडेपट्टा,इजारदार — ठेकेदार
इज्जत — प्रतिष्ठा, अब्रू,इतउपर — यापुढे,इतपत — एवढ्या प्रमाणात,इतबार — भरवसा,इतमाम — लवाजमा, सरंजाम
इतराजी — गैरमर्जी, अप्रसन्नता,इनकार / इन्कार — नाकबुली,इन्साफ — न्याय, निर्णय,इनाम — बक्षीस,ईंतजाम — व्यवस्था
ईंतजारी — वाट पाहणे,इब्लिस — सैतान, हलकट माणूस,इमला — इमारत, घर,इमान — प्रामाणिकपणा,इमाम — मुसलमानांचा धर्मगुरू,इमारत — घराची उभारणी,इरादा — हेतू, इच्छा,इलम — शास्त्र, विद्या,इलाखा — प्रांत, परगणा,इलायची — वेलदोडा
इशारत — इशारा, खूण,इश्क — प्रणय, शृंगार,इसम — मनुष्य,इसार — ठरलेल्या रकमेपैकी दिलेली आगाऊ रक्कम
ईद — मुसलमानी सण,ईसा — येशू ख्रिस्त
क्रमशः...
शब्दभांडार समृद्ध असेल, तर भाषेचे ज्ञानही समृद्ध होते!
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर
01 Sep 2026
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि एक्स प्रश्न ? -फुलसिंगजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता
01 Sep 2026
तो खरा 'विमुक्त दिन' असेल
01 Sep 2026
मराठी भाषेत अरबी व फारसी भाषेतून जे शब्द आले आहेत आणि रूढ झाले आहेत ते खालील प्रमाणे -
01 Sep 2026