Site Logo
महाराष्ट्र

मराठी भाषेत अरबी व फारसी भाषेतून जे शब्द आले आहेत आणि रूढ झाले आहेत ते खालील प्रमाणे -

प्रकाशित: 01 Sep 2026, 10:37 AM
104 Views
Featured News Image

पोहरादेवी दर्शन न्यूज ( प्रोफेसर अनंत सूर्यकार सर ) --मित्रांनो, शब्दभांडार ( vocabulary ) जरपरिपूर्ण असेल तर भाषेचे ज्ञान परिपूर्ण आहे असे समजावे 

अमीर - श्रीमंत,  अचानक - एकाएकी, अचंबीत - थक्क, अचावचा - भलतेसलते, अचुंबित - अगदी नवीन, अपूर्व, अचूकविचूक - असंबद्ध, काहीतरी, अजब - आश्चर्यकारक, अजम - श्रेष्ठ, थोर , अजाणता - नकळत, अजी - यापुढे, अगदी, अजुरदारी - मेहेनताना, मजुरी, अजूरा - त्रास, अज्जी - समूळ, अंचवणे - जेवल्यानंतर हात तोंड धुणे, अंजाम - परिणाम, शेवट, अडमोरी - तोंड फिरवून, अड्याल - अलीकडे, अतुट - न तुटता, अखंडितपणे, अदब - विनय, आदर, अदल - खरे, न्यायाला धरून, अक्ष - नखरा, शृंगारिक मुजरा, अदा - लाभ , प्राप्ती, अदालत - न्यायकचेरी, अदावत - खोटा आळ, वैर , अद्दल - शिक्षा, अध्धर - अधांतरी, अधांतरी - निराधार, अनंतर - मागाहून, अनाठायी - व्यर्थ, विनाकारण, अनामत -विश्वासाने ठेवलेली अगाऊ रक्कम, अनिर्वाहपक्षी - नाईलाजाने, अनुदिनी - दररोज, अनुलक्षून - मनात धरून, अंदाजा ( फा )- तर्क, अटकळ, अंदेशा ( फा )- संशय, शंका, अपबळ - स्वतः, आपण होऊन, अपाड - अतिशय, फार, अफलातून ( फा )- सुंदर, अफवा - बोलवा, अवाई, अफसोस (फा)- शोक, पस्तावा, दिलगिरी, अभावी - नसेल तर, ऐवजी, अमदनी - प्राप्ती, उत्पन्न, अमनचमन - शांती समृद्धी, अमल - अधिकार, सत्ता, अमानत - ठेव, विश्वस्त, अमीन - विश्वस्त, अमोरासमोर - समक्ष, अंबर ( फा)- धान्य भरून ठेवण्याची कोठी किंवा भंडारी , अंबरखाना - धान्य कोठार, अंबारी - हत्तीवर राजे रजवाड्यांनी बसण्याकरिता केलेले मेघडंबरी आसन , अयनक किंवा ऐनक - आरसा, अरकस ( फा )- करवत, अरत्र - या लोकात, अरत्र ना परत्र - ना इकडे ना तिकडे, अरुता - अलीकडे, अर्क ( फा)- बालेकिल्ला, अर्ज - जमिनीची रुंदी, विस्तार, अर्ज किंवा अर्जी - विनंती, प्रार्थना, अर्जबेग - अर्ज वरिष्ठांस वाचून दाखविणारा अधिकारी, अर्थाअर्थी - कोणत्याही रीतीने , अर्थात - म्हणजेच, अलबत, अलबत - खचित, खात्रीने , अलम - जग, लोक , अलवान - एक प्रकारचे लाल रंगाचे कापड, अलावा - मोहरमात ताबुतांच्यापुढे जी निखारे पेटविण्याकरिता खाच खणतात ती , मोहरमाचे दिवस, अलाहिदा - वेगळा, निराळा, अवकात - ताकद , बळ, अवचट -  अनपेक्षितपणे, एकदम , अवतीभवती - सभोवार, आवर्जून - मुद्दाम , अव्वल - उत्तम, पहिला अवलाद - वंश, संतती, अवलिया - साधू, लहरी मनुष्य, अवशीश - पूर्व रात्री, अवशी - रात्रीची सुरुवात, अवसात - एकाएकी, अवस्तूक - कधीही, चुकूनही, अवाच्या सव्वा - प्रमाणाबाहेर, असबाब - साधनसामग्री, युद्धसाहित्य, असर - परिणाम, प्रभाव, अस्सल - मुख्य, मूळचे, असामी - मोठा, मातब्बर माणूस, अस्तनी ( फा. )- बाहीचा कोपराच्या पुढील मनगटावरील भाग , अस्तवाल - तबेला, पागा, अस्मान (फा )- आकाश, अहर्निश - रात्रंदिवस, अळेबळे - कसेबसे, जुलुमाने , अक्षयी - सर्व काळ ...

क्रम


Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: