केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि एक्स प्रश्न ? -फुलसिंगजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता
पोहरादेवी दर्शन वेब न्यूज ( फुलसिंग जाधव सर )आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट (NEET) परीक्षा आणि पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्र्यांनी घेतलेली ही नैतिक जबाबदारी स्वागतार्ह असली, तरी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे लढाई जिंकली, असा अर्थ आंदोलकांनी काढू नये.
व्यापारीकरण आणि सडलेली शिक्षण व्यवस्था
आज दुर्दैवाने शिक्षण क्षेत्र हे ज्ञानाचे मंदिर न राहता राजरोषपणे पालकांना लुटणारी भयानक बाजारपेठ आणि मोठा व्यापार बनले आहे. शिक्षण व्यवस्थेला कोचिंग क्लासेस नावाची लागलेली ही कीड जोपर्यंत नष्ट होणार नाही, तोपर्यंत असे कितीही शिक्षण मंत्री बदलले तरी व्यवस्थेत काहीही फरक पडणार नाही.
नैतिक जबाबदारी संबंधित खात्याचा मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची नैतिक जबाबदारी निश्चितच होती आणि त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे. पण एवढ्याने सारे अलबेल होईल या भ्रमात कोणीही राहू नये.
आसूरी आनंद नको
आंदोलकांनी केवळ मंत्र्याने राजीनामा दिल्यामुळे आनंदोत्सव साजरा करणे अजिबात उचित नाही. केवळ मंत्र्याचा राजीनामा घेणे एवढेच आंदोलनकर्त्यांचे उद्दिष्ट होते का? जर तसे असेल, तर या सडलेल्या शिक्षण व्यवस्थेचे काय? हा अत्यंत महत्त्वाचा एक्स प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो.
गल्लीबोळात पसरलेल्या झुरळांचा समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे
केंद्र सरकारला जर खरोखरच शिक्षण क्षेत्राचे शुद्धिकरण करायचे असेल, तर या देशात गल्लीबोळात बेसुमार वाढुन पसरलेल्या कोचिंग क्लासेस नावाच्या झुरळांचा समूळ नायनाट करावा लागेल. त्याशिवाय देशाचे शिक्षण क्षेत्र कधीही खरी उभारी घेऊ शकणार नाही.
कीड जशीच्या तशी ठेवून केवळ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात कोणता पुरुषार्थ आहे?
शिक्षण मंत्र्यानी राजीनामा दिल्याने आंदोलकांनी अति उन्माद व्यक्त करु नये .
सध्याची परिस्थिती पाहता, रोगाचे मूळ न शोधता वरवर मलमपट्टी करण्यासारखा हा प्रकार आहे. सडलेल्या व्यवस्थेवर मूळातून घाव घालणे हीच आज काळाची सर्वात मोठी गरज आहे.
आंदोलनकर्त्यांना जर खरोखरच असे वाटत असेल की, कोचिंग क्लासेस ही शिक्षण व्यवस्थेला लागलेली एक अत्यंत विनाशकारी आणि पोखरून टाकणारी कीड आहे, तर त्यांनी आपले आंदोलन येथेच थांबवता कामा नये. शिक्षण क्षेत्रातील माफिया राज संपुष्टात येई पर्यंत हे आंदोलन चालूच ठेवावे. अर्थात कोचिंग क्लासेसच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी आपला हा लढा अधिक तीव्र केला पाहिजे. सडलेल्या व्यवस्थेवर घाव घालण्याचे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन अखंड चालू ठेवावे लागेल. कोचिंग क्लासेस नावाच्या या झुरळांचा कायमचा नायनाट होईपर्यंत जर हा लढा सुरूच राहिला, तर या आंदोलनाचा उद्देश अतिशय प्रामाणिक आणि देशहिताचा होता, असा स्पष्ट संदेश संपूर्ण देशभरात जाईल.
अन्यथा, वरवरच्या विजयामुळे हातात काहीच पडणार नाही आणि मूळ समस्या तशीच कायम राहील !
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मराठी भाषेत रूढ झालेले अरबी, फार्सी व हिंदी भाषेतील शब्द
02 Sep 2026
नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर
01 Sep 2026
तो खरा 'विमुक्त दिन' असेल
01 Sep 2026
मराठी भाषेत अरबी व फारसी भाषेतून जे शब्द आले आहेत आणि रूढ झाले आहेत ते खालील प्रमाणे -
01 Sep 2026