तो खरा 'विमुक्त दिन' असेल
पोहरादेवी दर्शन न्यूज (फुलसिंग जाधव सर ) आज विविध ठिकाणी विमुक्त दिन साजरा केला जात आहे. खरेच आम्ही मुक्त झालेलो आहोत काय ? हा विषय घेऊन ठिकठिकाणी चिंतन मेळावे, बैठका घ्यायला पाहिजेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या दावणीला समाज बांधण्याचे मेळावे होत असतील तर ही एक प्रकारची गुलामीच आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला मुळ भटक्या विमुक्त समाज बांधून कांहीही साध्य होणार नाही. स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही सामाजिक न्याय हक्कासाठी या समाजाला सतत संघर्ष करावा लागत आहे. पदरात आश्वसनापलिकडे दुसरे कांहीही पडत नाही. म्हणून बांधवांनो, आपण आजही मुक्त नाहीत. हे वास्तव समजून घ्या. या समाजातील स्वार्थी तीतरं पकडून राज्यकर्ते मुळ भटक्या व विमुक्त समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्यापलिकडे दुसरे कांहीही करीत नाहीत.
आज या प्रवर्गात होणारी घुसखोरी सर्वश्रुत आहे. पण सरकार हूं क चूं करीत नाही. उलट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या जात चोरांना सरकार बळ देऊन पाठीशी घालत आहे. सरकार बोगस घुसखोरीबाबत कोणतेही ठोस निर्णय घेऊन या घुसखोरीला आळा घालत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा ? एकीकडे सामाजिक न्यायाची भाषा करायची, न्याय हक्कासाठी मेळावे घ्यायचे आणि दुसरीकडे या समाजाला सामाजिक न्याय हक्कापासून दूर ठेवायचे, हे दुटप्पी धोरण सरकारने आणि विविध राजकीय पक्षांनी बंद केले पाहिजे.
ज्या दिवशी सरकार मुळ भटक्या विमुक्त समाजाला संविधानानुसार पूर्ण न्याय देऊन मुळ प्रवाहात आणेल तो दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी 'विमुक्त दिन' असेल.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मराठी भाषेत रूढ झालेले अरबी, फार्सी व हिंदी भाषेतील शब्द
02 Sep 2026
नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर
01 Sep 2026
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि एक्स प्रश्न ? -फुलसिंगजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता
01 Sep 2026
मराठी भाषेत अरबी व फारसी भाषेतून जे शब्द आले आहेत आणि रूढ झाले आहेत ते खालील प्रमाणे -
01 Sep 2026