वारंटमधील आरोपींची आता खैर नाही! मानोरा पोलिसांची धडक मोहीम; तिघांना अटक करून न्यायालयात हजर
मानोरा : न्यायालयीन तारखांना वारंवार गैरहजर राहणाऱ्या वारंटमधील आरोपींविरोधात मानोरा पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मानोरा पोलिसांनी वारंटमधील तिघा आरोपींना अटक करून प्रथमश्रेणी न्यायालय, मानोरा येथे हजर केले.
वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील) यांनी वारंटमधील आरोपींना अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणेदार नैना पोहेकर यांच्या आदेशाने मानोरा पोलीस ठाण्यात विशेष वारंट पथक तयार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामबाबू सरोदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हद्दीत आरोपींचा शोध सुरू केला.
या कारवाईत विनोद घासीराम आडे (रा. सोमेश्वरनगर), सुनील गुलाब चव्हाण (रा. आसोला खु.) आणि सुरेश तुळशीराम चव्हाण (रा. भुली) या वारंटमधील आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
गैरहजेरीमुळे न्यायालयीन प्रक्रियेला विलंब
न्यायालयाने तारीख दिल्यानंतरही संबंधित आरोपी हजर न राहिल्यास प्रकरणाच्या न्यायदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन पुढील तारीख द्यावी लागते. त्यामुळे वारंट बजावून आरोपींना वेळेत न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबविली.
वारंट पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील), अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नैना पोहेकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामबाबू सरोदे, पोहेकॉँ गजानन चव्हाण, पोका चेतन राऊत, वैभव गाढवे, अनिल दहातोंडे, मपोकॉँ सुषमा लोखंडे व चापोहेकॉँ रुपेश नाईक यांच्या पथकाने केली.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मानोऱ्यात शहाणे ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला! शहाणे यांच्या सतर्कतेमुळे लाखोंचा ऐवज वाचला; गॅस कटरसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात
30 Aug 2026
तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांचा घणाघात! सेवादासनगरात धडक कारवाई; २ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त
30 Aug 2026
जुगारावर पोलिसांचा छापा; चौघांवर गुन्हा दाखल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
29 Aug 2026
बकऱ्या चोरल्या अन् थेट तुरुंगात! चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी
13 Aug 2026