मानोऱ्यात शहाणे ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला! शहाणे यांच्या सतर्कतेमुळे लाखोंचा ऐवज वाचला; गॅस कटरसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात
मानोरा : शहरातील दिग्रस चौक परिसरातील शहाणे ज्वेलर्स दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्याचा चार अज्ञात चोरट्यांचा डाव दुकानमालक राजू शहाणे यांच्या सतर्कतेमुळे फसला.
दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १.३० वाजता दुकानासमोरील सीसीटीव्हीमध्ये दृश्य दिसत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर राजू शहाणे तातडीने दुकानाकडे धावले. त्यांचा आवाज ऐकताच दुकानातून चार चोरटे बाहेर पळाले. तिघे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून पसार झाले, तर चौथा चोरटा काही अंतर धावत जाऊन त्याच वाहनात बसला.
दुकानाची पाहणी केली असता शटरची लॉकपट्टी व कुलूप तोडल्याचे आढळले. मागील खोलीतील गोदरेज डिफेंडर प्राईम तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिजोरीच्या बाजूचा भाग गॅस कटरच्या सहाय्याने जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून इंडेन गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, लाल-निळ्या नळ्या, गॅस कटर तसेच लोखंडी कोयता ताब्यात घेतला आहे. श्वान पथक व ठसे तज्ञ सकाळी मानोरा येथे दाखल झाले आहे. चोरट्या पर्यन्त पोहचून लौकरच पोलिस या प्रकरणाचा शोध घेईल अशी माहिती ठानेदार नैना पोहेकर यांनी दिली .
🔎 सीसीटीव्ही बंद करून चोरीचा कट?
चोरट्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्हीमध्ये दृश्य दिसू नये, अशी व्यवस्था केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. चोरीपूर्वी दुकानाची रेकी करण्यात आली होती का? चोरट्यांना दुकानाची माहिती कोणी दिली? पांढऱ्या स्कॉर्पिओचा शोध लागतो का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
याप्रकरणी राजू अशोकराव शहाणे यांच्या तक्रारीवरून चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गणेश राठोड व चेतन भोयर तपास करीत आहेत.
📍 पोहरादेवी दर्शन | मानोरा-वाशिम परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp चॅनलला व poharadevidarshan. com वेब पोर्टल ला Follow करा.
https://drive.google.com/file/d/1AGfCGM5XljpYMi26xhgZamhMhMPJeLPj/view?usp=drivesdk
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांचा घणाघात! सेवादासनगरात धडक कारवाई; २ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त
30 Aug 2026
जुगारावर पोलिसांचा छापा; चौघांवर गुन्हा दाखल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
29 Aug 2026
वारंटमधील आरोपींची आता खैर नाही! मानोरा पोलिसांची धडक मोहीम; तिघांना अटक करून न्यायालयात हजर
29 Aug 2026
बकऱ्या चोरल्या अन् थेट तुरुंगात! चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी
13 Aug 2026