Site Logo
गुन्हे

जुगारावर पोलिसांचा छापा; चौघांवर गुन्हा दाखल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रकाशित: 29 Aug 2026, 09:11 AM
100 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : तालुक्यातील धामणी येथील नदीच्या काठी तीन पत्ती नावाचा जुगार पैशांच्या हारजीतीवर सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मानोरा पोलिसांनी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते व चार मोटारसायकली असा एकूण २ लाख १५ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास ग्राम धामणी येथील नदीकाठी करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत काही जण तीन पत्ती नावाचा जुगार पैशांच्या हारजीतीवर खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता काही जण गोल रिंगण करून जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत नितेश बाबाराव खापरकर (वय २२, रा. शिवाजीनगर, मानोरा), स्वप्निल जितेंद्र उजवे (वय १९, रा. धामणी, मानोरा), राहुल नारायण होलघरे (वय ३२, रा. धामणी, मानोरा) आणि संदीप रघुनाथ भस्मे (वय ३६, रा. शिवाजीनगर, मानोरा) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून ७९० रुपये रोख, ५२ तास पत्ते तसेच चार मोटारसायकली, किंमत अंदाजे २ लाख १५ हजार रुपये, असा एकूण २ लाख १५ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल राधेश्याम महाले यांनी दिली असून, पुढील तपास ठाणेदार नैना पोहेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार राधेश्याम महाले करीत आहेत.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा:

संबंधित बातम्या