शेंदुरजनातील नालीचे सांडपाणी रस्त्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मानोरा प्रतिनिधी : शेंदुरजना येथील नालीमधील दुर्गंधीयुक्त सांडपाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून विविध साथरोग पसरण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नालीची स्वच्छता करावी, सांडपाण्याचा योग्य निचरा करावा तसेच डास प्रतिबंधक उपाययोजना व औषध फवारणी करावी, अशी मागणी शेंदुरजना येथील नागरिकांतून होत आहे.
आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; मानोरा शहरवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
29 Aug 2026
गोल्डन अव्हर' वाचविण्यासाठी खासदारांची धडपड; कारंजा, मानोरा, मंगरुळपीरला एमआरआय-सीटी स्कॅनची मागणी
27 Jul 2026