मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; मानोरा शहरवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मानोरा : शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर, गल्लीबोळात तसेच सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यापूर्वी मोकाट कुत्र्यांनी शहरातील आठ ते दहा नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या असून, संबंधित नागरिकांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात धाव घ्यावी लागली. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. विशेषतः शाळा, बाजारपेठ, बसस्थानक, रुग्णालय परिसर तसेच रहिवासी भागात मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे.
रेबीजचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे
कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजसारख्या गंभीर आजाराचा धोका असतो. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर जखमेकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
शेंदुरजनातील नालीचे सांडपाणी रस्त्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
28 Aug 2026
गोल्डन अव्हर' वाचविण्यासाठी खासदारांची धडपड; कारंजा, मानोरा, मंगरुळपीरला एमआरआय-सीटी स्कॅनची मागणी
27 Jul 2026