Site Logo
गुन्हे

बकऱ्या चोरल्या अन् थेट तुरुंगात! चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

प्रकाशित: 13 Aug 2026, 05:10 PM
126 Views
Featured News Image

मानोरा : मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बकरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी अटक केलेल्या चारही आरोपींना १२ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी सतीश शृंगारे, करण विनोद राठोड, तुषार किशोर जाधव आणि प्रथमेश दिलीप या चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसी चौकशीत आरोपींनी बकरी चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून ४६ हजार रुपये किमतीच्या बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मानोरा तालुक्यातील बकरी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


#चोरीचा उलगडा; वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

बकरी चोरीच्या घटनांमुळे पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, मानोरा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून चार आरोपींना अटक केली. चौकशीत तीन गुन्ह्यांची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनकर राठोड, जमादार राधेश्याम महल्ले व पोलीस कर्मचारी रोशन तायडे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर राठोड करीत आहेत.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा:

संबंधित बातम्या