Site Logo
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; वारंवार अत्याचाराचा आरोप, पोक्सोसह गंभीर कलमे वाढवली आरोपीला अटक

प्रकाशित: 26 Jul 2026, 12:09 PM
219 Views
Featured News Image

मानोरा (प्रतिनिधी):  तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या जबाबानंतर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता  व पोक्सो कायद्यान्वये गंभीर कलमांची वाढ करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास मानोरा पोलिसांनी सुरू आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी मानोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २५ मे  रोजी पहाटे सुमारे १.३० वाजताच्या सुमारास त्यांची १६ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. मुलीचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर तिच्या खोलीत सिमकार्ड नसलेला मोबाईल आढळून आला. मोबाईलच्या कॉल रेकॉर्डमधील एका क्रमांकाची चौकशी केली असता तो धांवडा येथील पवन अशोक कांबळे याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित आरोपीचा शोध घेतला असता तोही घरी आढळून न आल्याने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत फिर्याद दाखल करण्यात आली.

दरम्यान, वाशिम येथील मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने  पीडितेचा शोध घेऊन तिला मानोरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर नोंदविण्यात आलेल्या जबाबात पीडितेने आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा तसेच पुणे येथे नेऊन भाड्याच्या खोलीत वारंवार जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला.

पीडितेच्या जबाबाच्या आधारे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६४(२)(आय)(एम), ६९ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ८ व १२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राम सरोदे करीत आहेत.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: