Site Logo
अध्यात्म

अँड. साजिद वर्षांनी यांचा सामाजिक उपक्रम; महापूजा व महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात

प्रकाशित: 31 Aug 2026, 07:44 PM
174 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे श्रावण सोमवारनिमित्त श्री जगदंबादेवी, श्री संत सेवालाल महाराज, दानशूर संत श्री बाबनलाल महाराज व श्री संत रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी दिग्रस येथील प्रसिद्ध विधीज्ञ अँड. साजिद वर्षांनी यांच्यातर्फे सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तब्बल १११ किलो फराळी चिवडा, दहा कॅरेट केळी तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

दि. ३१ ऑगस्ट रोजी श्री जगदंबादेवी व दानशूर संत श्री बाबनलाल महाराज पीठ, पोहरादेवी येथे महंत सुनील महाराज व सौ. अनामिका सुनील महाराज यांच्या हस्ते देवीची तसेच दानशूर संत श्री बाबनलाल महाराज यांची विधिवत महापूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना फराळाचे वाटप सुरू करण्यात आले.

श्रावण सोमवारच्या पवित्र पर्वावर दर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. धार्मिक श्रद्धेसोबतच भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

यावेळी भक्तराज महाराज, महंत अनिल महाराज, गोदाजीराव चव्हाण, बाबुसिंग नाईक, महंत केशव महाराज, निलेश राठोड, रामपाल महाराज, बळीराम जाधव, कैलास महाराज, अरविंद चव्हाण, रमेश जाधव, रमेश नाईक, नामदेव जाधव, बलदेव जाधव, कैलास आडे (उपसरपंच, तुळशीनगर), अनिल राठोड, गजानन शिवा राठोड, संतोष महाराज, विनोद महाराज, अक्षय शेखर राठोड, अजय महाराज, प्रफुल चव्हाण, विशाल जाधव, करण महाराज, आर्या महाराज, विक्रम जाधव, धनराज महाराज, ज्ञानेश्वर राठोड, शाम राठोड, हिरा जाधव, संजय रणमले, सुदेश राठोड, दिलीप पवार, रणवीर पवार यांच्यासह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.

श्रद्धेसोबत सेवाभावाचा संदेश

श्रावण सोमवारनिमित्त पोहरादेवीत आलेल्या भाविकांना फराळ व पाण्याचे वाटप करून अँड. साजिद वर्षांनी यांनी धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. भाविकांची सेवा हीच ईश्वरसेवा मानून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: