विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांसह सायबर सुरक्षेचेही भान ठेवावे : नैना पोहेकर
मानोरा : प्रतिनिधी
एलएसपीएम माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, धामणी (मानोरा ) येथे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शनिवार (दि. २५) जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मानोरा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार नैना पोहेकर यांनी विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी ठाणेदार नैना पोहेकर यांनी विद्यार्थ्यांनी शाळेत ये-जा करताना वाहतूक नियमांचे पालन करावे, दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच अमली पदार्थ, दारू, गुटखा व इतर व्यसनांपासून दूर राहून शिक्षणावर लक्ष केंद्रित करून स्पर्धा परीक्षेची तयारी करून आत्मनिर्भर बनावे असे आवाहन केले.
एपीआय रामबाबू सरोदे यांनी मोबाईलचा योग्य वापर, अनोळखी व्यक्तींचे फोन कॉल, सायबर फसवणुकीपासून बचाव तसेच आपत्कालीन परिस्थितीत ११२ या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली. तसेच शाळेच्या १०० मीटर परिसरात पानपट्टी, तंबाखू व गुटखा विक्रीस मनाई असल्याची माहिती देत विद्यार्थ्यांनी अशा व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला.
कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, जमादार दत्तात्रय भावके महाविद्यालयातील सुमारे विद्यार्थी उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये कायदे, वाहतूक सुरक्षा व सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मराठी भाषेत रूढ झालेले अरबी, फार्सी व हिंदी भाषेतील शब्द
02 Sep 2026
नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर
01 Sep 2026
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि एक्स प्रश्न ? -फुलसिंगजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता
01 Sep 2026
तो खरा 'विमुक्त दिन' असेल
01 Sep 2026