पाटोदा तांड्याच्या पालखीचे फुलउमरीत उत्स्फूर्त स्वागत; गुरुपौर्णिमा व बापू जन्मोत्सवानिमित्त पोहरादेवीकडे प्रस्थान
मानोरा : प्रतिनिधी
गुरुपौर्णिमा आणि राष्ट्रसंत डॉ. रामराव बापू यांच्या ९१ व्या जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवीकडे प्रस्थान करणाऱ्या पाटोदा तांडा (ता. सेनगाव) येथील पारंपरिक पालखीचे मंगळवारी सकाळी ११ वाजता फुलउमरी येथील नंदीबाबा संस्थानमध्ये भावपूर्ण स्वागत करण्यात आले. धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले.
धार्मिक वातावरणात हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला.
पाटोदा (ता. सेनगाव) येथून निघणारी ही पारंपरिक पालखी श्रीक्षेत्र पोहरादेवीकडे मार्गस्थ होते. या पालखीत तब्बल ५२ गावांतील वारकरी मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. पालखीचे दिंडी प्रमुख अध्यक्ष नारायण परसराम चव्हाण असून दिंडी सचिव लोभा राठोड आहेत. नायक म्हणून नरसिंग चव्हाण कार्यरत आहेत. तसेच रामेश्वर चव्हाण, नरसिंग आडे व राजू चव्हाण हे पंच कमिटीचे सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
नवव्या मुक्कामाच्या दिवशी नंदीबाबा संस्थान, फुलउमरी येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी भाजपचे प्रदेश समन्वयक भक्तराज महाराज यांनीही पालखीला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. विविध गावांत मुक्काम करत ही पालखी दहाव्या दिवशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे पोहोचते. गुरुपौर्णिमा तसेच धर्मगुरू डॉ. रामराव बापू यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो वारकरी या पालखीसह पोहरादेवीत दाखल होतात.
## यावेळी नंदीबाबा संस्थान, फुलउमरी यांच्या वतीने पालखीतील वारकरी व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सुरेश पांडुरंग राठोड व देवा राठोड यांनी चहा-पाण्याची व्यवस्था केली. धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज यांनी विधिवत भोग अर्पण केल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक वातावरणात हरिनामाच्या गजरात हा सोहळा उत्साहात पार पडला.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मराठी भाषेत रूढ झालेले अरबी, फार्सी व हिंदी भाषेतील शब्द
02 Sep 2026
नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर
01 Sep 2026
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि एक्स प्रश्न ? -फुलसिंगजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता
01 Sep 2026
तो खरा 'विमुक्त दिन' असेल
01 Sep 2026