लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांनी जपावा
मानोरा प्रतिनिधी :
वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, फुलउमरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक गजानन खंडारे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे पूजन करून करण्यात आली. यानंतर जीवन सोनोने यांनी तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात गजानन खंडारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण, साहित्य आणि कलेच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित व कष्टकरी घटकांचा आवाज बुलंद करणारे अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते, असे त्यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या बळावर जीवनात प्रगती साधावी, सामाजिक बांधिलकी जोपासावी आणि समतेची मूल्ये अंगीकारावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मराठी भाषेत रूढ झालेले अरबी, फार्सी व हिंदी भाषेतील शब्द
02 Sep 2026
नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर
01 Sep 2026
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि एक्स प्रश्न ? -फुलसिंगजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता
01 Sep 2026
तो खरा 'विमुक्त दिन' असेल
01 Sep 2026