Site Logo
थोर महापुरुष संत

गुन्हेगार जमातीचा कायदा- महानायक वसंतरावजी नाईकसाहेब आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत!

प्रकाशित: 01 Sep 2026, 09:56 AM
103 Views
Featured News Image

पोहरादेवी दर्शन न्यूज ( पंजाबराव चव्हाण याडीकार ) इंग्रज सरकारने भारतातील उद्योगधंदे आणि लदेणीं नष्ट केल्यामुळे  व्यवसाय बंद पडले .त्यामुळे अनेक भटक्या-विमुक्तांना उपासमारीचे जीवन जगावे लागले.त्यामुळे त्यांनी इंग्रज सरकारच्या विरुद्ध बंड पुकारल्यामुळे

इंग्रज सरकार हैराण झाले. आणि त्यांनी विल्यम स्लिमन या कमिशनरवर या लोकांचा अभ्यास करण्यासाठी जबाबदारी सोपविली त्यांनी विमुक्त भटक्यांच्या

डोळ्यांना ठग नाव दिले. आणि इंग्रज सरकारने 1850 पर्यंत या लोकांचा बंदोबस्त केला. आणि या कारवाईने प्रोत्साहित होऊन इंग्रजांनी विरोध करणाऱ्या आणि टोळीने राहणाऱ्या समाजासाठी सन 1871 ला  गुन्हेगार जमातीचा कायदा करून वंशपरंपरेनुसार गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर अमानविय कायदा लादला .तो जगात कुठेही नव्हता. या कायद्याच्या कारवाईची व्याप्ती व कार्यक्षेत्र वाढीसाठी इंग्रज सरकारने 1871 च्या कायद्याचे पुनर्गठन करून गुन्हेगार जमातीचा कायदा सन  1931मध्ये व्यापक प्रमाणात मंजूर केला .व भटक्या आणि बंजारा तत्सम जातीला जाचक अटीसह गुन्हेगार ठरवले. आणि भटक्या विमुक्तांचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला. या काळया कायद्याच्या जोखडातून  मुक्तीसाठी सन 1937 मध्ये कायद्याचे निशांत पंडित व दिन दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत पद्मश्री रामसिंगजी भानावत यांची भेट लोकनायक बापूजी अणे यांनी करून दिली. या जोखडातून  मुक्तीसाठी आपल्या सहकार्याची  नितांत गरज असल्याचे पद्मश्री रामसिंगजी भानावत यांनी पटवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या समस्येचा निपटारा करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी व्हाईसरॉय लिनलिथगो यांना गुन्हेगार जमातीचा कायदा त्वरित रद्द करणे बाबतचे निवेदन लिहून बंद पाकीट लिफाफा पद्मश्री रामसिंगजी भानावत या खासदूतामार्फत पाठवीत असल्याचे त्यामध्ये नमूद केले. त्यावेळी तत्कालीन परिस्थितीमध्ये व्हाईसरॉय यांना भेटणे फार कठीण काम होते. पद्मश्री रामसिंगजी भानावत यांचे जिवलग मित्र न.ची. केळकर हे पूर्वी व्हाईसरॉय परिषदेत सदस्य होते. त्यांनी न.ची केळकर यांना सोबत घेऊन व्हाईसरॉय लीन लीथगो यांना भेटले. त्यासाठी त्यांना अनेक दिवसाची प्रतीक्षा करावी लागली .परंतु व्हाईसरॉय यांनी त्यावर कोणतेही ठोस निर्णय दिले नाही.आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही भटक्या विमुक्तांच्या माथी  गुन्हेगार जमातीचा डाग जसाच्या तसाच होता. हे डाग पुसण्यासाठी महानायक वसंतराव नाईकसाहेब यांनी धडपड करून डॉ पंजाबराव देशमुख यांच्या सह भारताचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना निवेदन दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सन 1947 ला पद्मश्री रामसिंगजी भानावत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटले त्यावेळेस ते मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. गुन्हेगार जमातीचा काळा कायदा रद्द करावा आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. असे सांगून अशी विनंती करून त्यासोबतच त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद व पंडित जवाहरलाल नेहरू ला भेटून पद्मश्री रामसिंगजी भानावत यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर पद्मश्री रामसिंगजी भानावत त्यांच्या नेतृत्वात बंजारा सिस्टमंडळ यांनी 19 ऑगस्ट 1949 रोजी गुन्हेगार जमातीचा कायदा रद्द करणेबाबत तत्कालीन उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना भेटून निवेदन दिले . पंरतु दुर्दैव असे की 15 डिसेंबर 1950 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले. वसंतराव नाईकसाहेब,पद्मश्री रामसिंगजी भानावत,साखाराम मुडे गुरुजी बाबुसिंग राठोड, आणि चंद्राम चव्हाण गुरुजी सोलापूर यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना गुन्हेगार जमातीचा कायदा रद्द करण्याबाबत विनंती केली आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरदार पटेल यांचे पत्र सोबत घेऊन पाठपुरावा केला .त्यामुळे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा कायदा रद्द करण्यासाठी अंयगांर  समिती गठीत केली. आणि या समितीने हा कायदा 197 जातीसाठी जाचक असल्याचे स्पष्ट केले. पद्मश्री रामसिंगजी भानावत यांनी भटक्या व बंजारांच्या एकूण 197 जातीला गुन्हेगार जमातीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवारलाल नेहरू ,सरदार वल्लभाई पटेल, न.ची. केळकर, काका कालेरकर ,आचार्य कृपलानी यांची भेट घेऊन गुन्हेगार जमातीच्या गंभीर कायद्याची दखल घेण्यास बाद्य केले. अखेर गुन्हेगार जमाती कायदा स्वतंत्र भारताच्या पार्लमेंट मध्ये रद्द करण्याचा ठराव पास झाला. आणि  31 ऑगस्ट 1952 रोजी तब्बल 80  वर्ष असलेला अमानुषपणे छळ करणारा जुना कायदा रद्द करण्यात आला.याची घोषणा सोलापूर येथे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी येऊन केली. आणि त्यांना विमुक्त घोषित केले. या सर्व घटनेचे श्रेय महानायक वसंतराव नाईकसाहेब आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत आणि त्यांच्या सोबत असलेल्या गोर सुधारकांना  जाते.हा विमुक्त दिन प्रथम साजरा करण्याची सुरुवात प्रा.मोतीराज राठोड सर यांनी औरंगाबाद येथुन सुरू केलेली आहे. म्हणून आज आपण विमुक्त दिनाच्या शुभेच्छा देत आहोत.

जय वसंतराव नाईकसाहेब ...जय पद्मश्री रामसिंगजी भानावत

 संदर्भ

१) भटक्या विमुक्तांचे समाज सुधारक पद्मश्री रामसिंगजी भानावत -लेखक सुरेश राठोड रुडावत पेज क्रमांक 46 ते 48.

२)  वसंतराव नाईक राजनीति के अग्रदूत और कृषी औद्योगिक क्रांती के प्रणेता प्रथम अखंड- लेखक डॉक्टर दिनेश सेवा राठोड पेज- क्रमांक 197

✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद -9421774372

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: