बंजारा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अखंड सुरू राहणार' गेवराईतील भव्य बंजारा जागृती मेळाव्यात ना. संजय राठोड यांची ग्वाही; बंजारा भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
गेवराई (प्रतिनिधी) : "राज्यातील हजारो बंजारा तांड्यांचा सर्वांगीण विकास, समाजाला संविधानिक अधिकार मिळवून देणे आणि शिक्षण, सामाजिक, साहित्यिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात बंजारा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच माझे ध्येय आहे. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी आयुष्यभर शर्थीने लढत राहीन, अशी ठाम ग्वाही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा बंजारा समाजाचे प्रमुख नेते ना. संजय राठोड यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे महानायक, माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य बंजारा जागृती मेळाव्यात उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. हजारो समाजबांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज, ज्येष्ठ विचारवंत प्रा. फुलसिंग जाधव, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळराजे दादा पवार, युवा नेते यशराजभैय्या पंडित, प्रसिद्ध वक्ते संजयभाऊ चव्हाण, राष्ट्रीय बंजारा महासंघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा. पी. टी. चव्हाण, उत्तम चव्हाण, अण्णासाहेब राठोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यार्थी, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक आणि राजकीय उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ना. संजय राठोड यांना मराठवाड्यातील समाजबांधवांच्या वतीने प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय बंजारा भूषण पुरस्कार प्रदान करून हजारो उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात गौरविण्यात आले.
गेवराई येथे गेल्या तीन दशकांपासून वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा बंजारा समाजातील कॅबिनेट मंत्र्यांची प्रथमच उपस्थिती लाभल्याने समाजबांधवांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील विविध जिल्ह्यांतून महिला, युवक, अधिकारी, कर्मचारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आदर्श विष्णूभैय्या राठोड, लक्ष्मण चव्हाण, हरिभाऊ महाराज, राहुल चव्हाण, विजय राठोड, कैलास राठोड, बाबासाहेब राठोड, राजेंद्र सांगळे, गोरख पवार, पवन जाधव, गोटू राठोड, परमेश्वर राठोड, कृष्णा राठोड, रामेश्वर पवार, राजेंद्र जाधव, गणेश चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक माधव चाटे यांनी केले.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मराठी भाषेत रूढ झालेले अरबी, फार्सी व हिंदी भाषेतील शब्द
02 Sep 2026
नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर
01 Sep 2026
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि एक्स प्रश्न ? -फुलसिंगजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता
01 Sep 2026
तो खरा 'विमुक्त दिन' असेल
01 Sep 2026