वसतीगृह कर्मचारी मधुकर राठोड यांना भावनिक निरोप
मानोरा प्रतिनिधी : वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, फुलउमरी येथे वसतीगृह कर्मचारी मधुकर राठोड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावनिक सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जी. डी. खंडारे होते, तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मधुकर राठोड यांनी प्रदीर्घ सेवाकाळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व समर्पित कार्याचा गौरव केला. त्यांच्या सेवेमुळे शाळेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान लाभल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
शिक्षक जीवन सोनोने, उगले तसेच गजानन खंडारे यांनी मनोगत व्यक्त करताना राठोड यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. पुढील आयुष्य निरोगी, आनंदी व समाधानाचे जावो, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका एम. एस. जाधव यांनी केले. शेवटी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मधुकर राठोड यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
धानोरा बु. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; ग्रामस्थ आक्रमक विशेष ग्रामसभा घेण्याची
09 Sep 2026
ग्रामीण ग्राहकांसाठी एलपीजी बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द आता २५ दिवसांनीच पुन्हा सिलिंडर बुकिंगची सुविधा
09 Sep 2026
ग्रामविकास अधिकाऱ्यांची दांडी; आरटीआयने उघडणार पाच वर्षांचा कारभार!
01 Sep 2026
राशनच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन; फुलउमरीत अनोख्या आंदोलनाने खळबळ
29 Aug 2026