Site Logo
वाशिम जिल्हा

वनदेव राठोड यांचे घवघवीत यश; एलएल.एम.मध्ये वर्गातून प्रथम

प्रकाशित: 28 Aug 2026, 02:21 PM
98 Views
Featured News Image

मानोरा : तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील वनदेव सदगुण राठोड यांनी हिमाचल प्रदेश राष्ट्रीय विधी विद्यापीठातून  कायद्यातील पदव्युत्तर पदवी एलएल.एम. यशस्वीरीत्या पूर्ण करत घवघवीत यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात वनदेव यांनी वर्गातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

वनदेव यांनी घटनात्मक व प्रशासकीय कायदा या विशेष अभ्यासक्रमात तृतीय क्रमांक मिळविला असून, सेवा कायदा या विषयातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, वनदेव यांनी महाराष्ट्रात बंजारा समाजाला आरक्षण का मिळावे? या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल संशोधन करून आपला शोधप्रबंध पूर्ण केला. या संशोधनातून बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचा कायदेशीर व घटनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे.वनदेव राठोड यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पोहरादेवी परिसरासह मानोरा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

मुख्याध्यापक सद्गुण राठोड यांचा मुलगा वनदेव याने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर कुटुंबाचे तसेच पोहरादेवीचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: