तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात लाख आश्रमशाळेचा डंका; द्वितीय क्रमांक पटकावला
लाख (खिंड )लाख (खिंड ) भोला जाधव प्रतिनिधीकडून : राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव २०२६ अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव दारव्हा नगर परिषद शाळा क्र. ३ येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभावी आविष्कार सादर केला.
स्पर्धेमध्ये ‘मित्र की शत्रू’, ‘इलेक्ट्रिक वाहने – पुढचा मार्ग’, ‘अंतराळातील मानवी वस्ती’ तसेच ‘महासागराचे पुनरुज्जीवन – पिढ्यांचे जतन’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी नाट्य सादरीकरण केले. विज्ञानातील विविध संकल्पना मनोरंजक व प्रभावी पद्धतीने मांडत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळवली.
या स्पर्धेत पद्मश्री रामसिंगजी भानावत वि.जा.भ.ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, लाख (खिंड), ता. दारव्हा, जि. यवतमाळ या शाळेच्या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याला नवी ओळख मिळाली असून, शाळेचा नावलौकिक वाढला आहे.
या यशाबद्दल सहभागी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही विज्ञानाकडे सर्जनशील व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मानोरा खरेदी-विक्री संस्थेची वार्षिक आमसभा उत्साहात संस्थेच्या विकासासह सभासदांच्या हिताच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
03 Sep 2026
तांडा-पाड्यांपर्यंत संविधानाचा जागर; तांडा सुधार समिती घेणार संविधान संमेलन
31 Aug 2026
दोन दमदार पावसाची आस; सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे ऐन काढणीच्या तोंडावर पावसाने दडी मारल्याने बहरलेले पीक हातातून जाण्याची भीती
30 Aug 2026
जवारा विसर्जनाने फुलउमरीत तिज उत्सवाची सांगता
29 Aug 2026