Site Logo
वाशिम जिल्हा

राशनच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन; फुलउमरीत अनोख्या आंदोलनाने खळबळ

प्रकाशित: 29 Aug 2026, 09:18 AM
130 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळत नसल्याच्या मागणीसाठी फुलउमरी येथील कबीरदास दयाळू जाधव यांनी २८ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातील टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. दुपारी ३ वाजतापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे गावात खळबळ उडाली असून, जाधव यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

कबीरदास जाधव यांच्या कुटुंबाला नियमानुसार ८ किलो ज्वारी व १२ किलो तांदूळ मिळत असून, २८ ऑगस्ट रोजी त्यांना चालू महिन्याचे धान्य देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, जाधव हे जुलै महिन्याचे राशन मिळावे, अशी मागणी करीत आहेत.

दरम्यान, जाधव हे जुलै महिन्यात राशन घेण्यासाठी उपस्थित नसल्याने त्या महिन्याचे धान्य देता येत नसल्याचे स्वस्त धान्य दुकानदाराकडून सांगण्यात आले. राशनच्या मागणीवरून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

# कबीरदास जाधव यांच्या कुटुंबाला नियमानुसार ८ किलो ज्वारी आणि १२ किलो तांदूळ २८ ऑगस्ट रोजी देण्यात आले आहे. जुलै महिन्याचे राशन घेण्यासाठी ते त्यावेळी हजर नव्हते. त्यामुळे नियमानुसार जुलै महिन्याचे राशन देता येत नाही. त्यांना राशन देण्यास आमची कोणतीही हरकत नाही; मात्र शासनाच्या नियमाप्रमाणेच धान्य वितरण करावे लागते, असे स्वस्त धान्य दुकानदार विनेश चव्हाण यांनी सांगितले.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: