फुलउमरीतील पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह; निकृष्ट बांधकामाचा ग्रामस्थांचा आरोप
मानोरा : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या फुलउमरी गावातील मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने पुलाच्या बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र, पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणाऱ्या स्टीलच्या जाडीबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, काम दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
फुलउमरी येथील मुख्य रस्त्यावरून सिमेंट, धान्य, गिट्टी, मुरूम आदी साहित्याची वाहतूक करणारी अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे पुलाची बांधकाम क्षमता मजबूत असणे आवश्यक आहे. मात्र, सदर पुलाच्या बांधकामात ८ ते १० एमएम स्टीलचा वापर होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे भविष्यात अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्यानंतर पुलाला तडे जाणे अथवा पूल खचण्याची शक्यता असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, “पुलाच्या कामासाठी इस्टीमेटनुसार १० एमएम स्टीलचा वापर करण्यात आला आहे,” अशी माहिती बांधकाम विभाग, मानोरा येथील अभियंता कैलास मगर यांनी दिली.
पुलाचे बांधकाम हे गावाच्या मुख्य रस्त्यावर होत असल्याने भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी. आवश्यकतेनुसार तांत्रिक निकषांनुसार मजबूत बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
ग्रामविकास अधिकाऱ्यांची दांडी; आरटीआयने उघडणार पाच वर्षांचा कारभार!
01 Sep 2026
राशनच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन; फुलउमरीत अनोख्या आंदोलनाने खळबळ
29 Aug 2026
वनदेव राठोड यांचे घवघवीत यश; एलएल.एम.मध्ये वर्गातून प्रथम
28 Aug 2026
घरकुल लाभार्थ्यांकडून ग्रामरोजगार सहाय्यकास मारहाण; कठोर कारवाईची मागणी
28 Aug 2026