Site Logo
वाशिम जिल्हा

मानोरा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

प्रकाशित: 10 Oct 2026, 04:41 AM
175 Views
Featured News Image

मानोरा, दि. ९ ऑक्टोबर : मानोरा तालुक्यातील आगामी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात पार पडली. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

यावेळी कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, तहसीलदार राजेंद्र पाटील आणि नायब तहसीलदार उमेश बनसोड उपस्थित होते. आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आरक्षण प्रवर्गनिहाय ग्रामपंचायतींची यादी

१. अनुसूचित जाती (एससी)

अनुसूचित जाती :

वापटा, सोयजना, आसोला खुर्द, हिवरा खुर्द आणि भुली.

अनुसूचित जाती महिला :

पारवा, फुलउमरी, वाईगौळ, पाळोदी आणि ढोणी.

२. अनुसूचित जमाती (एसटी)

अनुसूचित जमाती :

दापुरा बुद्रुक, सिंगडोह, हातना, माहुली, उमरी बुद्रुक आणि गोंडेगाव.

अनुसूचित जमाती महिला :

कुपटा, सोमनाथनगर, खापरदरी, मेद्रा आणि पोहरादेवी.

३. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.)

नागरिकांचा मागास प्रवर्ग :

हिवरा बुद्रुक, कोंडोली, वटफळ, एकलारा, रुद्राळा, रोहणा, तळप बुद्रुक, अभईखेडा  (चिठ्ठीद्वारे).

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला :

रतनवाडी, सेवादासनगर, शेंदोना, सावळी, कारपा, आमदरी आणि कार्ली.कोलार ( चिठी द्वारे ) 

४. सर्वसाधारण प्रवर्ग

सर्वसाधारण :

अजनी, दापुरा खुर्द, भोयणी, चौसाळा, चोंढी, धामणी, बोरव्हा, कारखेडा, वरोली, सोमठाणा, साखरडोह, गोस्ता, रूई, उमरी खुर्द, धावंडा, तोरणाळा, देवठाणा, आमगव्हाण, खांबाळा,

सर्वसाधारण महिला :

इंझोरी, जामदरा (घोटी), म्हसणी, मोहगव्हाण, जनुना खुर्द, आसोला बुद्रुक, देऊरवाडी, पंचाळा, गादेगाव, गव्हा, विठोली, गिरोली, भिलडोंगर, शेंदुरजना, सोमेश्वरनगर, वसंतनगर (पोहरा), आमकिन्ही, धानोरा बुद्रुक,हळदा, हातोली 

आरक्षणानंतर ग्रामपंचायत निवडणुकांकडे लक्ष

सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीमुळे मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आरक्षणानुसार संबंधित गावांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम आणि मतदानाच्या तारखा याबाबत स्वतंत्र अधिकृत घोषणा झाल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: