Site Logo
वाशिम जिल्हा

मानोरा नगर पंचायत कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

प्रकाशित: 04 Aug 2026, 11:40 AM
110 Views
Featured News Image

 मानोरा, ता. ३ : मानोरा नगर पंचायत कार्यालयात स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी नगर पंचायतचे मुख्याधिकारी उमेश राठोड यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तैलचित्राचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी उमेश राठोड यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रप्रेम, त्याग आणि समाजसेवेच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीने अनुकरण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास नगर पंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रम शांत व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: