कारखेडा शिवारात बिबटाच्या पावलांचे ठसे; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मानोरा (प्रतिनिधी) :
मानोरा तालुक्यातील कारखेडा गावालगतच्या शेतशिवारात बिबटाच्या पावलांसारखे ठसे आढळल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना ओलसर मातीमध्ये मोठ्या आकाराचे पंजाचे ठसे दिसून आले. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
शेतकऱ्यांनी संबंधित ठशांचे छायाचित्र काढून वन विभागाला माहिती देण्याची मागणी केली आहे. शेतात जनावरे चारण्यासाठी तसेच शेतीची कामे करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, अशी चर्चा गावात सुरू आहे. विशेषतः सकाळी लवकर व सायंकाळच्या वेळी शेतात एकट्याने जाणे टाळावे, असे आवाहनही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांत परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याची चर्चा असून, या ठशांची वन विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून ते बिबटाचेच आहेत का, याची खात्री करावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
धानोरा बु. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; ग्रामस्थ आक्रमक विशेष ग्रामसभा घेण्याची
09 Sep 2026
ग्रामीण ग्राहकांसाठी एलपीजी बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द आता २५ दिवसांनीच पुन्हा सिलिंडर बुकिंगची सुविधा
09 Sep 2026
ग्रामविकास अधिकाऱ्यांची दांडी; आरटीआयने उघडणार पाच वर्षांचा कारभार!
01 Sep 2026
राशनच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन; फुलउमरीत अनोख्या आंदोलनाने खळबळ
29 Aug 2026