जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत कु. निकिता पवार हिची भरारी! विभागीय स्पर्धेसाठी निवड
मानोरा, प्रतिनिधी : शालेय शिक्षण व क्रीडा मंडळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिडा स्पर्धा संपन्न होत आहेत. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये गोळाफेक या क्रीडा प्रकारात कु. निकिता बाळू पवार हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून, सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. तिच्या या यशामुळे मानोरा तालुक्यासह वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या दैदीप्यमान कामगिरीच्या बळावर तिची आगामी अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु. निकिता पवार ही श्री वामन महाराज कन्या विद्यालय कोलार ता. मानोरा जि. वाशिम येथील विद्यार्थिनी आहे. ती जगदंबानगर, हळदा येथील रहिवासी असून, ग्रामपंचायत हळदा येथील उपसरपंच श्री बाळूभाऊ पवार यांची कन्या आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करण्याची क्षमता असल्याचे अधोरेखित झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. निकिताने मिळवलेले यश हे तिच्या मेहनतीचे फलित असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.
तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा मार्गदर्शक, पालकवर्ग तसेच जगदंबानगर, हळदा परिसरातील नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धेतही निकिता उत्कृष्ट कामगिरी करून यशाची परंपरा कायम राखेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागातील कन्येने क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून, संपूर्ण मानोरा तालुका तथा वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरले आहे. निकिताच्या पुढील क्रीडा वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
अमरावती शिक्षक मतदारसंघात २६ उमेदवारांचे आव्हान! सरनाईकांसमोर बंडखोरांची कोंडी; भोयर, देशपांडे आणि अदिती पोहरे यांच्या लढतीकडे लक्ष
12 Oct 2026
वाशीमच्या दुष्काळी परिस्थितीवरून अंबादास दानवे आक्रमक; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी
24 Sep 2026
प्रिय , वाचकहो ! उद्या या मालिकेचा शेवट होईल . पुढे कोणती वाङ्मयीन मालिका चालवायची ते ठरवू या ! आपल्या सूचना मला शिरसावंद्य आहे .
20 Sep 2026
पोहरादेवीत आंदोलनाचा अखेर ‘तूर्त विराम’; ३१ डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ
20 Sep 2026