Site Logo
वाशिम जिल्हा

गव्हा शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आकाश कुराडे

प्रकाशित: 14 Aug 2026, 11:41 AM
135 Views
Featured News Image

मानोरा : येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी नुकतीच पालक-शिक्षकांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आकाश ज्ञानेश्वर कुराडे, उपाध्यक्षपदी उज्वला काजळे, तर तज्ञ संचालकपदी चेनसिंग प्रतापसिंग राठोड यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.

शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना देणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपक्रम राबविणे तसेच पालक, शिक्षक व शाळा यांच्यात समन्वय वाढविण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस ग्रामपंचायत प्रशासक राहुल भगत, आनंद देशमुख, दिनेश मोरे, बाळू मीरासे आदी मान्यवर तसेच पालक व शिक्षक उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: