धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मानोरात जल्लोष; विद्यार्थी व विरोधकांनी फटाके फोडून व्यक्त केला आनंद
मानोरा, दि. २५ जुलै : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. नीट परीक्षा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निर्णयानंतर मानोरा येथे विद्यार्थी आणि विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना यश मिळाल्याची भावना व्यक्त करत घोषणाबाजी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, स्पर्धा परीक्षांमध्ये प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली.
या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रवी पवार, जिल्हा तांडा सुधार समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश राठोड, ठाकूरसिंग चव्हाण, बाजार समिती संचालक सुनील जामदार, शरद हांडे, अंकुश पवार, महेश राठोड, संतोष पुरी, गोधळेकर पेंटर, आवेश सरमातीया, प्रफुल्ल पाटील, महेंद्र मनवर, संजय वाघमारे, गजानन सोनटक्के, शेख सर, गोपाल चव्हाण, सिद्ध शिकारे, धीरज भगत, लक्ष्मीकांत वाघमारे, इरफान शेख, राजा पटेल, दादाराव आडुळे, अशर, इक्बाल शेख, विष्णू वानखेडे, सुशांत खडसे यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
धानोरा बु. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; ग्रामस्थ आक्रमक विशेष ग्रामसभा घेण्याची
09 Sep 2026
ग्रामीण ग्राहकांसाठी एलपीजी बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द आता २५ दिवसांनीच पुन्हा सिलिंडर बुकिंगची सुविधा
09 Sep 2026
ग्रामविकास अधिकाऱ्यांची दांडी; आरटीआयने उघडणार पाच वर्षांचा कारभार!
01 Sep 2026
राशनच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन; फुलउमरीत अनोख्या आंदोलनाने खळबळ
29 Aug 2026