धानोरा बु. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; ग्रामस्थ आक्रमक विशेष ग्रामसभा घेण्याची
मानोरा प्रतिनिधी : तालुक्यातील धानोरा बु. येथील ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राहावे, यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांनी ८ सप्टेंबर रोजी तहसीलदार राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आयोजित करावी, तसेच सन २०२३ पासून निवेदनाच्या तारखेपर्यंत झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र व निष्पक्ष लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, विशेष ग्रामसभेस ग्रामसेवकांनी उपस्थित राहावे. ग्रामपंचायतीमार्फत सन २०२३ पासून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी, तसेच या व्यवहारांच्या चौकशीसाठी स्वतंत्र चौकशी समिती गठीत करून सक्षम अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशीचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना अधिकृत पातळीवर स्पष्टता मिळावी आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची वस्तुनिष्ठ माहिती ग्रामस्थांसमोर यावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, १३ सप्टेंबरपर्यंत वरील मागण्यांवर समाधानकारक कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या मागण्यांवर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता धानोरा बु. ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
ग्रामीण ग्राहकांसाठी एलपीजी बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द आता २५ दिवसांनीच पुन्हा सिलिंडर बुकिंगची सुविधा
09 Sep 2026
ग्रामविकास अधिकाऱ्यांची दांडी; आरटीआयने उघडणार पाच वर्षांचा कारभार!
01 Sep 2026
राशनच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन; फुलउमरीत अनोख्या आंदोलनाने खळबळ
29 Aug 2026
वनदेव राठोड यांचे घवघवीत यश; एलएल.एम.मध्ये वर्गातून प्रथम
28 Aug 2026